STUDY JOB LINE

Marathi Mhani | मराठी म्हणी

मिंत्रानो महाराष्ट्र शासनाच्या सर्व सपर्धा परीक्षेसाठी सर्वात महत्वाचा विषय म्हणजे मराठी आणि त्या विषयातील अगदी सोपा आणि मार्क्स मिळवून देणारे प्रकरण म्हणजे म्हणी होय .
विद्यार्थी मित्रांनो मला माहित आहे तुम्हे सर्व विद्यार्थी लहान पनापासून म्हणी ऐकत आले असणार त्यामुळे तुम्हाला हा विषय अगदी सोपा वा सहज वाटत असणार मात्र मित्रांनो आपण ह्या विषयाला जिस्तके सोपे समजत आहेत तितका तो नाही आहे .
अश्या खूप म्हणी आहेत ज्यांचे अर्थ आपल्याला लागत नाहीत किंवा सहज सोप्या वाटणाऱ्या म्हणींचा योग्य अर्थ आपल्याला माहित नसतो त्यामुळे उगाच आपल्या चुकीने आपले हातचे मार्क्स जातात .
त्यामुळे आम्ही आज आपल्यासाठी परीक्षेत नेहमी विचारल्या जात असलेल्या म्हणींचा योग्य अर्थ आपल्याला सांगणार आहोत .

मराठी भाषेतील म्हणी व त्यांचे अर्थ
आपला हात जगन्नाथ आपली प्रगती आपल्या कर्तृत्वावर अवलंबून असते.
आंधळं दळतं कुत्रं पिठ खातं एकाने काम करावे दुसऱ्याने त्याचा फायदा घ्यावा.
अति तेथे माती कोणत्याही गोष्टीचा अतिरेक वाईटच असतो.
आयत्या बिळात नागोबा दुसर्‍याने स्वत:साठी केलेल्या गोष्टीचा आयता फायदा उठविणे.
अडली गाय फटके खाय एखादा माणूस अडचणीत सापडला, की त्याला हैराण केले जाते.
आईजीच्या जीवावर बाईजी उदार दुसर्‍याचा पैसा खर्च करून औदार्य दाखविणे.
आपल्याच पोळीवर तूप ओढणे फक्त स्वत:चाच तेवढा फायदा साधून घेणे.
आंधळे दळते कुत्रं पीठ खाते एकानं काम करावं आणि दुसर्‍यांनं त्याचा फायदा घ्यावा.
आधी पोटोबा मग विठ्ठोबा आदी पोटाची सोय पाहावी नंतर देवधर्म करावा.
असेल त्या दिवशी दिवाळी नसेल त्यादिवशी शिमगा अनुकूलता असेल तेव्हा चैन करणे आणि नसेल तेव्हा उपवास करण्याची पाळी येणे.
अडला हरी गाढवाचे पाय धरी एखाद्या हुशार माणसाला देखील अडचणीच्या वेळी मूर्ख माणसाची विनवणी करावी लागते.
आंधळा मागतो एक डोळा, देव देतो दोन डोळे अपेक्षेपेक्षा जास्त फायदा होणे.
अति शहाणा त्याचा बैल रिकामा जो माणूस फार शहाणपणा करायला जातो. त्याचे मुळीच काम होत नाही.
अवशी खाई तूप आणि सकाळी पाही रूप अतिशय उतावळेपणाची कृती.
आधी शिदोरी मग जेजूरी आधी भोजन मग देवपूजा
असतील शिते तर जमतील भुते एखाद्या माणसाकडून फायदा होणार असला की त्याच्या भोवती माणसे गोळा होतात.
आचार भ्रष्टी सदा कष्टी ज्याचे आचार विचार चांगले नसतात. तो नेहमी दु:खी असतो.
आठ हात लाकूड अन नऊ हात ढिपली अत्यंत मूर्खपणाची अतिशयोक्ती.
आईचा काळ बायकोचा मवाळ आईकडे दुर्लक्ष करून बायकोची काळजी घेणारा
आधीच उल्हास त्यात फाल्गुन मास मुळातच आळशी माणसाच्या आळशी वृत्तीला पोषक अवस्था निर्माण होणे.
आपलेच दात आपलेच ओठ आपल्याच माणसाने चूक केल्यावर अडचणीचे स्थिती निर्माण होणे.
अंथरूण पाहून पाय पसरावे आपल्या ऐपतीप्रमाणे खर्च ठेवावा.
अंगापेक्षा बोंगा मोठा मूळ गोष्टींपेक्षा अनुषांगिक गोष्टींचा बडेजाव मोठा असणे.
आवळा देऊन कोहळा काढणे क्षुल्लक गोष्टीचा मोबदल्यात मोठा लाभ करून घेणे.
आलीया भोगाशी असावे सादर कुरकुर न करता निर्माण झालेली परिस्थिती स्वीकारणे.
अचाट खाणे मसणात जाणे खाण्यापिण्यात अतिरके झाल्यास परिणाम वाईट होतो.
आधी बुद्धी जाते नंतर लक्ष्मी जाते अगोदर आचरण बिघडते नंतर दशा बदलते.
आपण हसे लोकाला, शेंबूड आपल्या नाकाला ज्या दोषाबद्दल आपण दुसर्‍याला हसतो. तोच दोष आपल्या अंगी असणे.
आपला तो बाब्या दुसर्‍याचं ते कारटं स्वत:चे चांगले आणि दुसर्‍यांचे वाईट अशी प्रवृत्ती असणे.
अळी मिळी गुप चिळी रहस्य उघडकीला येऊ नये म्हणून सर्वांनी मूग गिळून बसणे.
अहो रूपम अहो ध्वनी एकमेकांच्या मर्यादा न दाखवता उलटपक्षी खोटी स्तुती करणे.
इच्छा तेथे मार्ग एखादी गोष्ट करण्याची इच्छा असेल तर काहीतरी मार्ग निघतोच.
इकडे आड तिकडे विहीर दोन्ही बाजूंनी अडचणीची परिस्थिती असणे.
उठता लाथ बसता बुकी प्रत्येक कृत्याबद्दल अद्दल घडविण्यासाठी पुन्हा पुन्हा शिक्षा करणे.
आपल्याच पोळीवर तूप ओढणे फक्त स्वतःचाच तेवढा फायदा साधून घेणे.
उडत्या पाखरची पिसे मोजणे अगदी सहजपणे अवघड गोष्टीची परीक्षा करणे.
उधारीचे पोते सव्वाहात रिते उधारी घेतलेल्या गोष्टीत तोटा ठरलेलाच असतो.
उंदराला मांजर साक्ष वाईट कृत्य करतांना एकमेकांना साक्ष देणे.
उचलली जीभ लावली टाळ्याला विचार न करता बोलणे.
उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग प्रसंगी हास्यास्पद ठरेल आशा प्रकराच्या उतावळेपणा दाखविणे.
उथळ पाण्याला खळखळाट फार थोडासा गुण अंगी असणारा माणूस जास्त बढाई मरतो.
उस गोड लागला म्हणून मुळासकट खाऊ नये कोणत्याही चांगल्या गोष्टीचा किंवा एखाद्याच्या चांगुलपणाचा प्रमाणाबाहेर फायदा घेऊ नये.
एक ना घड भारभर चिंध्या एकाच वेळी अनेक कामे करायला घेतल्यावर सर्वच कामे अर्थवट होण्याची अवस्था.
एका माळेचे मणी सगळीच माणसे सारख्या स्वभावाची.
एका हाताने टाळी वाजत नाही दोघांच्या भांडणात पूर्णपणे एकट्यालाच दोष देता येत नाही किंवा एखाद्या कृत्यात दोघेही दोषी असणे.
ऐकावे जनाचे करावे मनाचे लोकांचे ऐकून घ्यावे व मग आपल्याला जे योग्य वाटेल ते करावे.
एका म्यानात दोन तलवारी राहू शकत नाहीत दोन तेजस्वी माणसे एकत्र गुण्यागोविदाने नांदू शकत नाहीत दोन सवती एका घरात सुखासमाधानाने राहू शकत नाहीत.
आलिया भोगासी असावे सादर तक्रार व कुरकुर निर्माण झालेली परिस्थिती स्वीकारणे.
ओळखीचा चोर जीवे न सोडी ओळखीचा शत्रू हा अनोळखी शत्रूपेक्षा धोकादायक असतो.
कर नाही त्याला डर कशाला ज्याने काही गुन्हा किंवा वाईट गोष्ट केली नाही त्याने शिक्षा होण्याचे भय कशाला बाळगावयाचे
कामापुरता मामा ताकापुरती आजी आपले काम करून घेईपर्यंत एखाद्याशी गोड बोलणे.
काळ आला होता. पण वेळ आली नव्हती नाश होण्याची वेळ आली असताना थोडक्यात बचावणे.
कानामगून आली आणि तिखट झाली मागून येऊन वरचढ होणे.
करावे तसे भरावे जसे कृत्य असेल त्याप्रमाणे चांगलेवाईट फळ भोगावे लागते.
कधी गाडीवर नाव तर कधी नावेवर गाडी कधी गरीबी तर कधी श्रीमंती येणे.
कुर्‍हाडीचा दांडा गोतास काळ आपलाच माणूस आपल्या नाशाला कारणीभूत होतो.
काठी मारल्याने पानी दुभंगत नाही – रक्ताचे नाते तोडून म्हणता तुटत नाही.
कडू कारले तुपात तळले सारखरेत घोळले तरीही कडू ते कडूच किती ही प्रयत्न केला तरीही माणसाचा मूळ स्वभाव (दूर्वर्तणी) बदलत नाही.
कुडी तशी पुडी देहाप्रमाणे आहार असतो.
कधी तुपाशी तर कधी उपाशी संसारिक स्थिती नेहमी सारखीच राहत नाही त्यात कधी संपन्नता येते तर कधी विपन्नावस्था येते.
कावळा बसायला अन फांदी तुटायला परस्परांशी कारण-संबंध नसताना योगायोगाने दोन गोष्टी एकाचवेळी घडणे.
कुत्र्याचे शेपूट नळीत घातले तरी वाकडे ते वाकडेच कितीही प्रयत्न केले तरी काहीचा मूळस्वभाव बदलत नाही.
कुंपणाने शेत खाल्ले तर दाद न्यावी कुणीकडे रखवालादारानेच विश्वासघात करून चोरी करणे.
कोल्हा काकडीला राजी क्ष्रुद्र माणसे क्षुद्र गोष्टीनीही खुश होतात.
कोरड्याबरोबर ओले ही जळते निरपराध्याची अपराध्यासोबत गणना करणे
कोंबडे झाकले म्हणून तांबडे फुटायचे राहत नाही निश्चित घडणारी घटना कोणाच्याही प्रयत्नाने टाळता येत नाही.
काखेत कळसा नि गावाला वळसा हरवलेली वस्तु जवळ असतानाही इतरत्र शोधत राहणे.
कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही क्षुद्र माणसांनी केलेल्या दोषा रोपाने थोरांचे नुकसान होत नसते.
खाण तशी माती आई वडिलाप्रमाणे त्यांच्या मुलांचे वर्तन होणे.
खर्‍याला मरण नाही खरे कधी लपत नाही, सत्य मेव जयते!
खाऊ जाणे ते पचवू जाणे एखादे कृत्य धाडसाने करणारा त्याचे परिणाम भोगण्यासही समर्थ असतो.
खाईन तर तुपाशी नाहीतर उपाशी परिस्थितीशी जुळवून न घेता हट्टीपणाने वागणारा.
खाऊन माजवे टाकून माजू नये पैशाच्या संपतीचा गैरवापर करू नये.
खोट्याच्या कपाळी गोटा वाईट कृत्य करणार्‍याला माणसाचे शेवटी वाईटच होते.
गरजवंताला अक्कल नसते गरजेमुळे अडलेल्या व्यक्तीला इतरांच्या म्हणण्यापुढे मान डोलवावी लागते.
गर्वाचे घर खाली गर्विष्ठ माणसाची कधीतरी फजिती होतेच.
गरज सरो नि वैध मरो आपले काम झाले की उपकार कर्त्याची पर्वा न करणे.
गर्जेल तो पडेल काय केवळ गाजावाजा करणार्‍या व्यक्तीच्या हातून फारसे काही घडत नसते.
गाढवाला गुळाची चव काय? मुर्खाला चांगल्या गोष्टीची किंमत कळत नाही.
गाढवांचा गोंधळ, लाथांचा सुकाळ मूर्ख लोक एकत्र आल्यावर मूर्खपणाचेच कृत्य करणार
गाव करी ते राव ना करी श्रीमंत व्यक्ति स्वत:च्या बळावर जे करू शकत नाही ते एकीच्या बळावर सामान्य माणसे करू शकतात.
गाड्याबरोबर नळ्याची यात्रा मोठ्यांच्या आश्रयाने लहानांचाही फायदा होतच असतो.
गाढवापुढे वाचली गीता अन कालचा गोधळ बारा होता मूर्खाला केलेला उपदेश वाया जातो.
गाजराची पुंगी वाजली तर वाजली नाही तर मोडून खाली एखादी गोष्ट साध्य झाली तर उत्तमच नाही तर तिचा दूसरा उपयोग करून घेणे.
गाढवाच्या पाठीवर गोणी एखाद्या गोष्टीची अनूकुलता असून उपयोग नाही. तर तिचा फायदा घेता यायला हवा.
गुरुची विद्या गुरूला फळली एखाद्याचा डाव त्याच्यावरच उलटणे.
गुळाचा गणपती गुळाचाच नैवेद्य ज्याची वस्तु त्यालाच भेट देणे.
गोगलगाय नि पोटात पाय एखाद्याचे खरे स्वरूप न दिसणे.
गोरागोमटा कपाळ करंटा दिसायला देखणा पण नशिबाने दुर्दैवी व्यक्ती.
घर ना दार देवळी बिर्‍हाड बायको पोरे नसणारा एकटा पुरुष किंवा शिरावर कोणतीही जाबाबदारी नसलेली व्यक्ती.
घर फिरले म्हणजे घराचे वासेही फिरतात एखाद्यावर प्रतिकूल परिस्थिती आली म्हणजे सारेच त्याच्याबरोबर वाईटपणे वागू लागतात.
घरचे झाले थोडे, व्याह्याने धाडले घोडे स्वत:च्या कामाचा व्याप अतोनात असताना दुसर्‍यांने आपलेही काम लादणे.
घर पहावे बांधून लग्न पहावे करून अनुभवाने माणूस शहाणा होतो.
घटका पाणी पिते घड्याळ टोले खाते आपापल्या कर्मानुसार परिणाम भोगावे लागतात.
घरोघरी मातीच्याच चुली सर्वत्र सारखीच परिस्थिती अनुभवास येणे.
घोडे खाई भाडे धंद्यात फायद्यापेक्षा खर्च जास्त.
चढेल तो पडेल गर्विष्ठ माणसाचा गर्व उतरल्याशिवाय राहत नाही.
चालत्या गाडीला खीळ व्यवस्थीत चालणार्‍या कार्यात अडचण निर्माण होणे.
चमत्काराशिवाय नमस्कार नाही, पराक्रमावाचून पोवाडा नाही लोकांना काही विशेष कार्य करून दाखविल्याशिवाय लोक मान देत नाहीत.
चिंती परा येई घरा दुसर्‍याबदल मनात वाईट विचार आलेकी स्वत:चेच वाईट होते.
चोर सोडून सान्याशाला फाशी खर्‍या गुन्हेगाराला शासन न करता दुसर्‍याच निरपराध माणसाला शिक्षा देणे.
चोराच्या उलटया बोंबा स्वत:च गुन्हा करून दुसर्‍यावर आळ घेणे.
चोराच्या मनात चांदणे वाईट माणसांनाच वाईट माणसांच्या युक्त्या कळतात.
चोरावर मोर एखाद्या गोष्टीच्या बाबतीत दुसर्‍यावर कडी करणे.
जळत्या घराचा पोळता वासा प्रचंड नुकसानीतून जे वाचले ते आपले म्हणून समाधान मानावे.
जलात राहुन माशांशी वैर करू नये ज्यांच्या सहवासात राहावे लागते त्यांच्याशी वैर करून नये.
जन्माला आला हेला, पाणी वाहून मेला निरक्षर किंवा निर्बुद्ध माणसाचे आयुष्य शारीरिक कष्टामध्येच जाते.
जळत घर भाड्याने कोण घेणार नुकसान करणार्‍या गोष्टीचा स्वीकार कोण करणार.
जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे दुसर्‍याच्या स्थितीत आपण स्वत:जावे, तेव्हा तिचे खरे ज्ञान आपणास होते.
ज्या गावाच्या बोरी त्याच गावच्या बाभळी एकमेंकाचे वर्म माहीत असणार्‍या माणसांशी गाठ पडणे.
ज्याचे खावे मीठ त्याचे करावे निट जो आपल्या वर उपकार करतो त्या उपकार कर्त्याला स्मरण करून त्याच्या यशासाठी प्रयत्न करावेत.
जशी देणावळ तशी धुणावळ मिळणार्‍या मोबदल्याच्या प्रमाणातच काम करणे.
ज्याचे करावे बरे तो म्हणतो माझेच खरे एखाद्याचे भले करायला जावे तर तो विरोधच करतो व आपलाच हेका चालवतो.
जी खोड बाळ ती जन्मकळा लहानपणीच्या सवयी जन्मभर टिकतात.
ज्याच्या हाती ससा तो पारधी ज्याला यश मिळाले तो कर्तबगार
जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही मूळचा स्वभाव आयुष्यात कधीच बदलत नाही.
जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाते उद्धरी मातेकडून बालकावर सुसंस्कार होतात म्हणून ते भविष्यात कर्तुत्ववान ठरते.
झाकली मूठ सव्वा लाखाची व्यंग गुप्त ठेवणेच फायद्याचे असते.
टाकीचे घाव सोसल्याशिवाय देवपण येत नाही कष्ट केल्याशिवाय मोठेपणा मिळत नाही.
टिटवी देखील समुद्र आटविते सामान्य क्षुद्र वाटणारा माणूस प्रसंगी महान कार्य करू शकतो.
डोळ्यात केर आणि कानात फुंकर रोग एक आणि उपचार दुसराच
डोंगर पोखरून उंदीर काढणे प्रचंड परिश्रम घेवूनही अल्प यश प्राप्ती होणे.
तंटा मिटवायला गेला गव्हाची कणिक करून आला भांडण मिटविण्याऐवजी भडकावणे.
तळे राखील तो पाणी चाखील आपल्याकडे सोपविलेल्या कामाचा थोडाफार लाभ मिळविण्याची प्रत्येकाची प्रवृत्ती असते.
ढवळ्या शेजारी पवळ्या बांधला वाण नाही पण गुण लागला वाईट माणसाच्या सहवासामध्ये चांगला माणूसही बिघडतो.
ताकापुरते रामायण आपले काम होईपर्यंत एखाद्याची खुशामत करणे
तोंड दाबून बुक्यांचा मार एखाद्याला विनाकारण शिक्षा करणे आणि त्याला त्याबद्दल तक्रार करण्याचा मार्गही बंद करणे.
तेल गेले तूप गेले आणि हाती धुपाटणे राहिले फायद्याच्या दोन गोष्टीमधून मूर्खपणामुळे एकही गोष्ट साध्य न होणे.
Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

Touch in Social Media

Latest Job

Education Wise Job

Admit Card

Latest Results


Warning: Undefined array key "includeposts" in /home/u832285350/domains/blog24.org/public_html/STUDYJOBLINE/wp-content/plugins/list-category-posts/include/lcp-widget.php on line 137
Ads Blocker Image Powered by Code Help Pro

Please allow ads on our site

Looks like you\'re using an ad blocker. We rely on advertising to help fund our site.

Powered By
100% Free SEO Tools - Tool Kits PRO
error: Content is protected !!