Latest Books To Crack Any Government Exam
How to join NDA (National Defence Academy) एन.डी.ए ची
How to join NDA (National Defence Academy) तयारी एन.डी.ए ची- देशासाठी काहीही करण्यासाठी आजची तरुण पिढी तयार आहे. देशाच्या संरक्षणासाठी आणि सन्मानासाठी काहीतरी करुन दाखवण्याची उर्मी या तरुणांमध्ये असते. मग देशाचे संरक्षण करण्याबरोबरच एक अत्युच्च प्रतीची जीवनशैली जगण्याचा सर्वोत्तम पर्याय म्हणजे भारतीय सैन्यदलांत म्हणजेच लष्कर, नौदल किंवा हवाई दलात अधिकारी होणे…!!! आज संपूर्ण भारतातील लाखो तरुण भारतीय सैन्यदलांत अधिकारी होण्याचं स्वप्नं उराशी बाळगून असतात. आणि संपूर्ण देशही सर्व प्रकारच्या आपत्कालीन स्थितीमध्ये आपल्या संरक्षणदलांच्या भरवश्यावर निश्चिंत असतात. मग तो एखादा अतिरेकी हल्ला असो किवां देशाने नुकताच अनुभवलेला चेन्नई सारखा महापूर असो किंवा ढासळलेली कायदा व सुरक्षा स्थिती असो…. कोणत्याही आपत्कालीन स्थितीमध्ये एकदा का लष्कराने तेथील स्थितिचा ताबा घेतला की सर्वसामान्य नागरिकांच्या मनात सुरक्षेची भावना निर्माण होते.

भारतीय संरक्षण दले देखील वेळोवेळी आपल्या देशातील तरुणांना लष्करी अधिकारी होण्याची संधी देत असतात. आज आपण आंतरराष्ट्रीय पातळीवर ख्याती प्राप्त संस्था “राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी” म्हणजेच “National Defence Academy (NDA) / एन.डी.ए.” च्या पात्रता, निवड प्रक्रिया व निवड झाल्यानंतरचे प्रशिक्षण या बद्दल माहिती पाहणार आहोत. भारतीय लष्कर, नौदल व हवाई दलात अधिकारी होण्याची पूर्व तयारी संरक्षण मंत्रालयाच्या अखत्यारीत असलेल्या एन.डी.ए., खडकवासला, पूणे येथे करवून घेतली जाते.
NDA- Qualification criteria शैक्षणिक पात्रता:
How to join NDA – एन.डी.ए. मध्ये दाखल होतांना उमेदवार १२वी उत्तीर्ण असायला हवा. अर्ज करण्यासाठी विद्यार्थी १२वीत शिकत असावा अथवा १२वी उत्तीर्ण असावा. एन.डी.ए. च्या आर्मी शाखेसाठी उमेदवार १२वी च्या कला, विज्ञान किंवा वाणिज्य शाखेचा असावा. आणि हवाई दल व नौदल शाखेसाठी उमेदवारने १२वी ला गणित व भौतिकशास्त्र (Maths आणि Physics) हे विषय घेतलेले असावे.
NDA-Age Criteria वयोमर्यादा
NDA–एन.डी.ए मध्ये दाखल होतांना उमेदवारांचे वय – साडे सोळा ते साडे एकोणीस (Sixteen and Half to Nineteen and Half) दरम्यान असावे.
NDA-Selection process (निवड प्रक्रिया)
NDA- एन.डी.ए मध्ये दाखल होण्याचा एकमेव मार्ग म्हणजे केंद्रीय लोकसेवा आयोगा मार्फत घेतली जाणारी प्रवेश परीक्षा व त्यानंतर होणारी सर्व्हिसेस सिलेक्शन बोर्ड (SSB) मुलाखत उत्तीर्ण करणे हा होय.
NDA- Entrance Exam (प्रवेश परीक्षा)
NDA- एन.डी.ए ची प्रवेश परीक्षा वर्षातून दोनदा, एप्रिल व सप्टेंबर महिन्यात घेतली जाते. यासाठी महाराष्ट्रात मुंबई व नागपूर हे दोन केंद्र असतात. या परीक्षेसाठी दोन पेपर्स असतात त्यात पहिला पेपर गणित (३०० गुण) व दुसरा पेपर सामान्य अध्ययनाचा (६०० गुण) असतो. एकूण ९०० गुणांची परीक्षा होते. या दोन्ही पेपर्ससाठी प्रत्येकी अडीच तासांची वेळ असते. संपूर्ण परीक्षा ही बहुपर्यायी स्वरूपाची असते. दोन्ही पेपर्स हे एकाच दिवशी घेतले जातात. गणित या विषयासाठी इ. ११वी व १२वी चा अभ्यासक्रम असतो तर सामान्य अध्ययन या पेपर मध्ये इंग्रजी, फिजिक्स, केमिस्ट्री, इतिहास, भूगोल, बायोलॉजी, भारतीय राज्यघटना व चालू घडामोडी इत्यादी विषय सामाविष्ट असतात. परीक्षा झाल्यानंतर साधारणता तीन महिन्यांनी निकाल जाहीर केला जातो. जे उमेदवार लेखी परीक्षा उत्तीर्ण होतात त्यांना सर्व्हिसेस सिलेक्शन बोर्ड (SSB) मार्फत मुलाखती साठी बोलावले जाते.
NDA Interview -सर्व्हिसेस सिलेक्शन बोर्ड (SSB) मुलाखत
NDA Training (एन.डी.ए. मधील प्रशिक्षण)
NDA-एन.डी.ए. मधील प्रशिक्षण कालावधी हा बी. एस. सी. तीन तर बी. ई. चार वर्षांचा असतो. येथे विद्यार्थी आपल्या पदवी अभ्यासक्रमाबरोबरच खडतर शारीरिक व मिलिटरीचे प्रशिक्षणही पूर्ण करतात. एन.डी.ए. मधील बी. एस. सी. चा तीन वर्षांचा कालावधी हा सहा टर्म मध्ये विभागलेला असतो तर बी. ई. 8 टर्म मध्ये.
सैन्यदलांत अधिकारी होण्याचे फायदे
NDA-एक सैन्य अधिकारी म्हणून काम करत असतांना तरुणांना विविधतेने नटलेला आपला संपूर्ण देश पहाण्याची तसेच कामानिमित्त विदेशात जाण्याचीही संधी मिळते. सर्व प्रकारचे साहसी खेळ उदा. पैरा जंपींग, रिव्हर राफ्टींग, स्कुबा डायव्हिंग, रोप क्लायंबींग, ट्रेकिंग, बर्फावरील स्किईंग तसेच रायफल शुटींग, हॉर्स रायडींग, गोल्फ, पोलो, हॉकी, फुटबॉल व इतर सर्व खेळ खेळण्याची संधी मिळते.
When to apply (अर्ज कधी करावे)
NDA– जून मध्ये १२वी ला प्रवेश घेणारे तसेच १२वी उत्तीर्ण होणारे विद्यार्थी जून महिन्यात एन.डी.ए. च्या प्रवेश परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज करू शकतात. त्यांची एन.डी.ए. प्रवेशासाठी परीक्षा दि. सप्टेंबर मध्ये घेण्यात येईल. या विद्यार्थ्यांनी आपली ११वीची किंवा १२वी ची परीक्षा झाल्यानंतर लगेच मे महिन्यापासून एन.डी.ए. च्या प्रवेश परीक्षेची आणि मुलाखतीची अंतिम तयारी सुरु करायला हवी. यंदा १२वीला शिकत असलेल्या ज्या विद्यार्थ्यांनी एन.डी.ए. साठी अर्ज केला आहे त्यांची प्रवेश परीक्षा एप्रिल मध्ये घेण्यात येइल. या विद्याथ्यांना १२वी ची परीक्षा झाल्यानंतर जो वेळ मिळेल त्याचा उपयोग त्यांनी एन.डी.ए. च्या तयारीसाठी करावा.
शालेय विद्यार्थ्यांसाठी
NDA– सध्या शालेय शिक्षण घेत असलेले विद्यार्थी पुढील मार्गांनी एन.डी.ए. मध्ये दाखल होऊ शकतात.एन.डी.ए प्रवेश परीक्षा व मुलाखतीची तयारी करवून घेण्यासाठी शासनाने विविध संस्थांची स्थापना केलेली आहे.
सर्व्हिसेस प्रिपरेटरी इंस्टिट्यूट (SPI), औरंगाबाद: १०वी च्या विद्यार्थ्यांसाठी
NDA– या संस्थेची स्थापना महाराष्ट्र शासनाने केवळ महाराष्ट्रीयन मुलांसाठी केली गेलेली आहे. येथे विद्यार्थ्यांना इ. ११वी साठी प्रवेश देण्यात येतो. येथे विद्यार्थी १२वी पर्यंत शिक्षण घेतात. येथे ११वी व १२वी च्या अभ्यासाबरोबरच एन.डी.ए. प्रवेश परीक्षा व मुलाखतीची तयारी करवून घेतली जाते. आजवर या संस्थेने देशाला ४०० पेक्षा अधिक सैन्याधिकारी दिले आहेत. या संस्थेसाठी १०वीत शिकत असलेल्या मुलांकडून (पुरुष उमेदवार) अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्यासाठी विद्यार्थ्यांनी दि. २८ फेब्रुवारी पर्यंत आपले अर्ज संस्थेमध्ये पाठवावे. प्रवेश अर्ज व परीक्षा फी भरण्यासाठीचे बँकेचे चलन *www.spiaurangabad.com* या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. येथील प्रवेशासाठी प्रवेश परीक्षा व मुलाखत एप्रिल व मे मध्ये घेण्यात येईल.
Sarkari Naukari | |
Railway | Police/Defense |
SSC Jobs | State Govt Jobs |
IBPS | UPSC |
Teaching Jobs | Pharmacist |
Qualification Job | |
10th Pass | 12th Pass |
ITI Job | Diploma Job |
Graduation Job | Medical |
Post Graduation | MBA |