STUDY JOB LINE

67 वे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार जाहीर

67 वे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार जाहीर-67 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांसाठीच्या ज्युरींनी आज 2019 या वर्षासाठीच्या विजेत्यांची घोषणा केली. याआधी अध्यक्ष आणि ज्युरी सदस्यांनी केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांची भेट घेऊन विजेत्यांच्या नावाबाबत माहिती दिली.- study job line

• कोरोना व्हायरसने जगात घातलेल्या थैमानामुळे राष्ट्रीय पुरस्काराची घोषणा यंदा उशिरा करण्यात आली. • या वर्षी कंगना रणौतने सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा तर मनोज वाजपेयी आणि धनुषने सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळवला. • छिछोरे हा चित्रपट सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट ठरला तर बार्डो हा सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट ठरला. • बार्डो या चित्रपटातील गाण्यासाठी सावनी रविंद्रला सर्वोत्कृष्ट गायिकेचा पुरस्कार मिळाला.
कंगना राणौत • कंगना राणौतला राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळण्याची ही चौथी वेळ आहे. • सर्वात आधी 2008 साली चित्रपट 'फॅशन'साठी कंगनाला सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला होता. • त्यानंतर 2014 साली 'क्वीन' चित्रपटासाठी तर 2015 साली 'तनू वेड्स मनु रिटर्न्स'साठी तिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला आहे. • यंदा तिला 'मणिकर्णिका'चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला आहे, या चित्रपटाचे दिग्दर्शनही तिने स्वतःच केले आहे
प्रमुख पुरस्कार्थी
• सर्वोत्कृष्ट चित्रपट : मरक्कर (मल्याळी) • सर्वोत्कृष्ट अभिनेत्री : कंगना राणावत (मनकर्णिका आणि पंगा) • सर्वोत्कृष्ट अभिनेता : मनोज वाजपेयी (भोसले), धनुष (असुरन) • सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री : पल्लवी जोशी (ताश्कंद फाइल्स) • सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता: विजय सेतूपती (सुपर डिलक्स) • सर्वोत्कृष्ट सामाजिक चित्रपट : आनंदी गोपाळ (मराठी) • सर्वोत्कृष्ट शोध चित्रपट : जक्कल (मराठी)
इतर प्रमुख पुरस्कार
• सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक : संजय पुरनसिंह चौहान (भट्टर हुरे) • सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका : सावनी रवींद्र (बार्डो) • सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक: बी. प्राक (केसरी) • सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शक : डी. इम्मन (विश्वासम) • सर्वोत्कृष्ट प्रॉडक्शन डिझाइन : आनंदी गोपाळ, सुनील नागवेकर आणि नीलेश वाघ • सर्वोत्कृष्ट बालचित्रपट : कस्तूरी • सर्वोत्कृष्ट राष्ट्रीय एकात्मकता चित्रपट : ताजमहाल (मराठी) • सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट : छिछोरे • सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट : बार्डो • सर्वोत्कृष्ट कोकणी चित्रपट : काजरो • सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक (चित्रपटेतर विभाग): राजप्रितम मोरे (खिसा), मराठी
Facebook
Twitter
Telegram
WhatsApp
error: Content is protected !!